अहमदनगर तालूक्यात जामखेड तालूक्यात सूनेनं सासऱ्याचा भर रस्त्यात खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी महिलेला नगर पोलिसांनी अटक केली आहे. मयत सासऱ्याने सुनेच्या चारित्र्याव घेतलेल्या संशयावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की सुनेने सासऱ्याला लोखंडी कुऱ्हाड आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत सासऱ्याचा जागीच मृत्यु झाला आहे. अर्जुन गोविंद हजारे वय ६३ अस मृत सासऱ्याचं नाव आहे. तर सून ज्योती अतुल हजारे हिच्याविरुद्ध नगर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हाच पुढील तपास चालू आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण यांनी दिली.