मनुस्मृती दहन गुन्हा आहे का?
मनुस्मृती जाळल्यानंतर मला आणि कुटुंबीयांना धमक्या मिळत असल्याचा आरोप दलित कार्यकर्त्या आणि पत्रकार मीना कोतवाल यांनी केला आहे.
मनुस्मृती जाळल्यानंतर मला आणि कुटुंबीयांना धमक्या मिळत असल्याचा आरोप दलित कार्यकर्त्या आणि पत्रकार मीना कोतवाल यांनी केला आहे. त्या मूकनायक नावाचे यूट्यूब चॅनल व वेब पोर्टल चालवतात. मला काही झाल्यास यासाठी बजरंग दल आणि त्यासारख्या संघटना जबाबदार असतील अस मीना यांनी म्हंटले आहे.
मीना कोतवाल यांनी रविवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एकामागून एक ट्विट करून त्यांना मिळणाऱ्या धमक्यांची माहिती शेअर केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये लिहिलं आहे की, 'मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्याला बजरंग दल आणि यारारख्या संघटना जबाबदार असतील. स्वतःला बजरंग दलाचा म्हणवणारा अमन काकोडिया मला फोन करून मनुस्मृती जाळणारा व्हिडीओ हटवायला सांगत असून तस केलं नाहीतर बरे होणार नाही अशी धमकी देतोय. त्या दोघांमधील कॉल रेकॉर्डिंग सुद्धा त्यांनी शेअर केले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये मीना कोतवाल यांनी लिहिले की, मनुस्मृती जाळण्याचा व्हिडिओ हटवण्यासाठी ती व्यक्ती सतत दबाव टाकत आहे. जेव्हा मी हटवण्यास नकार दिला आणि मनुस्मृतीत महिला आणि दलितांचे वर्णन प्राण्यांपेक्षाही वाईट असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही व्यक्ती संतापली.
त्यानंतर त्यांनी आणखीन एक ट्विट केलं व त्यांनी दावा केला आहे की, बजरंग दल सारख्या संघटनेने त्यांचा फोन नंबर व्हायरल केला आहे आणि अनेक लोकांकडून फोन करून त्यांना धमकावले जात आहे आणि शिवीगाळ केली जात आहे.
अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मीना कोतवाल यांच्या बाजूने अनोळखी नंबरवरून आलेल्या धमक्यांवर आवाज उठवला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकार अलिशान जाफरी यांनी ट्विट करून मीना कोतवाल यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचं म्हंटले आहे.
अनेकांनी आता मीना कोटवाल यांना येत असलेल्या धमक्यांचा निषेध व्यक्त केला आहे. भीम आर्मी चे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी या कृत्याचा निषेध करत ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, ' निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या युवा पत्रकार मीना कोटवाल यांना बजरंग दलाच्या गुंडांकडून धमक्या दिल्या जात आहेत. हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे. मीनाताई या देशद्रोही गुंडांच्या धमक्यांना विचलीत होऊ नका. पूर्ण भीम आर्मी पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे.