सायबर कॅफे चालकाकडून विद्यार्थ्यांना NEET नीट परीक्षेचे बनावट हॉल तिकीट दिल्याचा आरोप

Update: 2022-07-24 04:37 GMT

 एका सायबर कॅफे चालकाने दोन विद्यार्थिनींना नीट परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरून दिले. मात्र विद्यार्थिनी परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर गेल्या असता हॉल तिकीट बनावट असल्याचे समजले. विद्यार्थिनींना पेपर न देताच परत यावे लागले. फसवणूक लक्षात येतात विद्यार्थिनी यवतमाळ शहर पोलिसात धाव घेतली वृषाली संतोष गिरी व नंदिनी संदीप मोकळकर अशी फसवणूक झालेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. यवतमाळ शहरातील पिंपळगाव परिसरातील कानन सायबर कॅफे येथे हा प्रकार घडला आहे.

कानन सायबर कॅफे चालक गिरीश बाळकृष्ण गेडाम याने या विद्यार्थिनी कडून नीट परीक्षेचा फॉर्म भरण्याकरिता 1700 रुपये घेतले तसेच त्याने रीतसर पावती सुद्धा दिली एवढेच नव्हे तर परीक्षा हॉल तिकीट सुद्धा दिले. परंतु, ते बनावट निघाल्याने खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या विद्यार्थिनींनी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे ठाणेदार नंदकिशोर पंत यांनी सांगितले.

Tags:    

Similar News