CWG 2022 : जेरेमी लालरिनुंगानं जिंकलं "सुवर्ण "

Update: 2022-07-31 10:59 GMT

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 बर्मिंगहॅम मध्ये सुरू आहेत .या स्पर्धेत मीराबाई चानू हिने सुवर्ण पदक जिंकून भारताच्या नावावर अजून एक विक्रम नोंदवला आहे . बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकत सांगलीतील संकेत सरसागर यांने विजयाची सुरुवात केली होती.

वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या सुवर्ण पदकानंतर आता भारताच्या नावे दुसरे सुवर्ण पदक मिळवण्याचा विक्रम भारतीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने केला आहे.




 



पुरुषांच्या 67 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जेरेमी लालऱीनूंगा याने सुवर्णपदक जिंकले. आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केलं.बर्मिंगहॅममध्ये भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळालेले हे पाचवे पदक आहे . 

Similar News