ढोलताशावर बाळाला ठेवून वादन करणाऱ्या महिलेवर टीकेची झोड

Update: 2024-04-10 10:01 GMT

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. सणासुदीचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. गुढीपाडव्याचा उत्साह महाराष्ट्रासोबतच परदेशातील मराठी बांधवांमध्येही दिसून आला. ढोलताशाचा गजर, लेझीम आणि पारंपारिक पोशाख यांनी सणाला उजळा आणला. मात्र सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे उत्साहा निमित्त खळबळ उडाली आहे.

आपण समाजात आशा अनेक महिला पाहत असतो ज्यांच्या पाठीला बाळ बांधलेल असतं आणि त्या या परिस्थितीत काम (मजुरी) करत असतात. पण काही महिला स्वत:ची प्रसिद्धी व्हावी यासाठी काय करतील हे सांगणे कठीण झाले आहे. नुकताचं ढोल तशा पथकातील एक महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडीओमध्ये एका ढोलताशा पथकातील महिला आपल्या लहान मुलाला गळ्यात बांधून ढोल वाजवताना दिसत आहे. जोरदार आवाज आणि ध्वनिप्रदूषणाचे मुलावर काय परिणाम होईल याची पर्वा न करता महिलेने केलेले कृत्य अनेकांना खटकणारे असल्याने या महिलेचा समाजमाध्यमांवर युजर्सनी चांगलाच समाचार घेतल्याच दिसत आहे.

सोशल मीडियावरून टीकेची झोड:

ढोलताशा पथकातील ज्या महिलेचा व्हिडिओ व्हारायल झाला आहे. तिच्यावर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो "सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणे योग्य नाही." लहान मुलांचे कान कमजोर असतात, जास्त आवाजाने लहान मुलांचे कान बधिर होण्याची शक्यता असते. म्हणून जोरदार आवाज हा लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा वाजवू शकतो. याच व्हिडिओवर कॉमेंट करतो आणि "फालतू हट्टासाठी आपल्या मुलावर अत्याचार का?" असा सवाल ढोलताशा पथकातील एका महिलेला सवाल करतो. तर दूसरा "मला त्या चिमुकल्यासाठी वाईट वाटतंय." अशी हळहळ व्यक्त करताना दिसत असून "ताई, पुन्हा असे स्टंट करू नका. तुमच्या मुलाच्या आरोग्याचा विचार करा." असा सल्ला सोशल मिडिया युजर्सनी दिला आहे. 

Tags:    

Similar News