दिवाळीपूर्वी एक गोड बातमी समोर येत असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तांत्रिक सल्लागार समितीने भारत बायोटेकच्या ( bharat biotech ) कोवॅक्सिनला ( Covaxin ) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. तर ही मंजुरी केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी देण्यात आली आहे.
भारत बायोटेकची कोरोना लस कोवॅक्सिनला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नव्हती. तर कोवॅक्सिनच्या मंजुरीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लसीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीचे प्रयत्न सुरू होते. मात्र अखेर आज जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिनला परवानगी दिली आहे.
गेल्या महिन्यात WHO ने दिले होते स्पष्टीकरण
जागतिक संघटनेने लसीला मंजुरी देण्यास झालेल्या विलंबाबाबत गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये एक मोठे विधान केले होते, ज्यामध्ये WHO ने म्हटले होते की, भारत बायोटेककडून लसीबद्दल अजून माहिती हवी आहे, जेणेकरून लसीच्या वापरासाठी मंजुरी देण्यापूर्वी त्याचे कसून मूल्यांकन करता येईल.