Covid-19 : WHO ने जरी केली नवीन मार्गदर्शक तत्वे

Update: 2023-01-17 05:16 GMT

चीनमध्ये कोरोना रुग्णानाची संख्या वाढल्याने भारत, जपान आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, केरळ सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लोकांना कार्यालये, सामाजिक मेळावे आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे लागणार आहे. तसेच, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. जपान टुडेच्या अहवालानुसार, सोमवारी (16 जानेवारी) 54 हजार 378 रुग्णानाची संख्या नोंदवण्यात आली. राजधानी टोकियोमध्ये 4 हजार 433 प्रकरणे आहेत. मृतांचा आकडा 284 वर पोहोचला आहे. 687 नवीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भारतात कोरोनाची स्थिती काय आहे...

शुक्रवारी भारतात 114 नवीन रुग्ण आढळले. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 1 हजार 146 सक्रिय प्रकरणे आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून आतापर्यंत देशात ५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

XBB.1.5 प्रकाराची एकूण 26 रुग्णानाची नोंद

INSACOG डेटानुसार, COVID-19 च्या XBB.1.5 प्रकारातील रुग्णांनाही संख्या 26 वर पोहोचली आहे. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने सांगितले की, XBB.1.5 प्रकाराची प्रकरणे आतापर्यंत दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळून आली आहेत.

WHO ने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली

WHO ने नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. त्यानुसार ज्या रुग्णांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत, त्यांनी 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे. मास्क वापरण्यावरही भर देण्यात आला आहे. याआधीही डब्ल्यूएचओने लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क घालण्यास सांगितले होते.

Tags:    

Similar News