Good News: भारतात मुलांवरील कोरोना लसीची चाचणी सुरू
जर ही चाचणी यशस्वी ठरली तर तात्काळ लस देखील तयार करण्यास सुरवात होणार आहे;
नवी दिल्ली: मुलांवरील कोरोना लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे स्वदेशी लसची चाचणी घेण्यात येत आहे. जर ही चाचणी यशस्वी ठरली तर तात्काळ लस देखील तयार करण्यास सुरवात होणार आहे.
पाटणातील एम्समध्ये मुलांवर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची लसीची चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. या लसीच्या चाचणीत आतापर्यंत 3 मुले सहभागी झाली आहेत.एम्समधील कोविड प्रभारी डॉ. संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर ही चाचणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी तीन मुलांना त्याचे इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शन दिल्यानंतर ही तिन्ही मुले सुरक्षित असल्याचं सुद्धा कुमार म्हणाले.
डॉ. संजीव कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पुढील महिन्यात 525 मुलांवर अशी चाचणी करण्यात येणार आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे 100 मुलांनी नोंदणी केली आहे. त्यांच्या तपासणीनंतर निवडलेल्या तीन मुलांवर चाचणी घेण्यात आली.
दुसर्या टप्प्यात, जर मुलांवर लसीचा कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नसेल तर, तिसर्या टप्प्यात लसीचा डोस दिला जाईल आणि प्रभावी आढळल्यास, लस मंजुरीसाठी पाठविली जाईल,असही डॉ. कुमार म्हणाले.