'रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन' - गुलाबराव पाटील
'रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन' असे वक्तव्य शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना विरोधात लढाई लढत असून सध्या त्या ठिकाणी प्रचार सभांना चांगलाच जोर आला आहे.
या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या एका प्रचार सभेत मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. आणि यावेळी त्यांनी 'तीस वर्षे आमदार असलेल्या लोकांना माझं आव्हान आहे. त्यांनी माझ्या मतदार संघात येऊन पहावं. धरणगावला हेमामालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर मी राजीनामा देईन.' असे वक्तव्य केलॆ.
अशा प्रकारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्याची तुलना हेमामालिनीच्या गालासोबत केल्यामुळे त्यांच्यावर टीका देखील होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हेमामालिनीचे गाल आणि रस्त्याची तुलना केल्याबाबत गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल केला पाहिजे असे म्हटले आहे. मागे मी केलेले एक वक्तव्य संदर्भहीन असून गदारोळ घातला होता आता महाविकास आघाडी सरकार गुलाबराव पाटलांवर काय कारवाई करणार? असा प्रश्न देखील दरेकर यांनी उपस्थित केला आहे.