काही दिवसांपुर्वी ठाण्यातील खराब रस्त्यांची जोरदार चर्चा झाली होती. एका बस ड्राइवर ने ठाण्यातील खराव रस्त्यांचा एक विडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला होता. या खराब रस्त्यांकडे पहा अशी विनंती त्या बस ड्राइव्हरने थेट मुख्यमंत्र्यांना केली होतो. यापूर्वी आपण मुख्यमंत्र्यांचं तुंबलेलं ठाणे देखील पाहिलं होतं आणि आता आपण मुख्यमंत्र्यांचं खड्डेमय ठाणे हपानार आहोत. ठाणे म्हटल्यावर फक्त शहर गृहित धरू नका तर संपुर्ण जिल्ह्याचा विचार करा. कारण मुख्यमंत्री हे संपुर्ण ठाणे जिल्ह्याचे आहेत. हे खड्डे किती रूंद आहेत आणि किती लांब आहेत याचं मोजमाप केलं आहे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी..