पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ यांचा स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप
टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी पुणे पोलीसांवर टीका केली आहे. यासंदर्भात चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
"संजय राठोड प्रकरणात पोलिसांच्या तपासात संदिग्धता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून इतर पोलिसांना देण्यात यावा. पुणे पोलिसांनी वन मंत्री अरुण राठोडची चौकशी केलेलीच नाहीय. माध्यमांनी अरुण राठोडची चौकशी केल्याच्या बातम्या दिल्या त्या सुध्दा खोट्या आहेत." असा आरोप चित्रा वाघ यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे.