नागपुरातील सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांवर संतापल्या

Update: 2021-08-02 05:40 GMT
नागपुरातील सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांवर संतापल्या
  • whatsapp icon

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात सामुहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर ऑटोचालक आणि कुलींनी सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, 'राज्यात काय सुरू आहे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे का?, म्हणत संताप व्यक्त केला आहे.

 चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की,
" राज्यात काय सुरू आहे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे का ???, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर दोनदा सामुहीक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, राज्यात अशा घटना वाढताना दिसताहेत. महिला व मुलींवरील अत्याचाराचे सत्र कुठेही थांबलेले दिसत नाही आजच्या या घटनेने शरमेने मान खाली गेली' असल्याचा चित्रा वाघ म्हणाल्यात.





   रेल्वेस्थानकावर आलेल्या पिडीत अल्पवयीन मुलीकडे पुरेसे पैसे नसल्याने ती रेल्वेने जाऊ शकली नाही. त्याच वेळी ऑॅटोचालक मोहंमद शहानवाज उर्फ साना वल्द मोहंमद रशीद याने तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीवर नेले. तिथे अन्य एक ऑटोचालक मित्र मोहंमद तौसीफ वल्द मो. युसूफ व मोहंमद मुशीर याच्यासह आणखी एकाला बोलावून घेतले. या चौघांपैकी दोघांनी गुरूवारी रात्री तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी मेयो चौकातील मेट्रो उड्डाणपुलाखाली ऑॅटोत बलात्कार करून शुक्रवारी पहाटे तिला मेयो रूग्णालया जवळ सोडून दिले. या घटनेने खळबळ उडाली असून, घटनेनंतर पुन्हा एकदा नागपूर शहर चर्चेत आले आहे.
Tags:    

Similar News