H3N2 धोका लहान मुलांना, मुलांची काळजी घ्या..

Update: 2023-03-19 03:25 GMT

राज्यात काल शनिवारी H3N2 बाधित तिघांचा संशयित मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे वाशिम खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे महानगरपालिका येथे या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे संक्षिप मृतांची संख्या आता चार झाली आहे. शनिवारी राज्यांमध्ये 18 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 184 इतकी आहे. राज्यात h3n2 ने एका रुग्णाचा तर h1 n1 ने आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. एक जानेवारीपासून आत्तापर्यंत इन्फुएंजाचे तीन लाख 4 हजार 686 संशयित रुग्ण सापडले आहेत.

H3N2 मुळे 5 वर्षांखालील मुले सर्वाधिक आजारी पडत आहेत.

H3N2 मुळे 5 वर्षांखालील मुले सर्वाधिक आजारी पडत आहेत. पुण्यातील परिस्थिती अशी झाली आहे की, आयसीयूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे लहान मुले आहेत. व्हेंटिलेटरचीही तीच अवस्था आहे. H3N2 मुळे पुद्दुचेरीतील शाळा २६ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

H3N2 हा कोरोनासारखा धोकादायक आहे का?

जयपूरच्या जेकिलॉन हॉस्पिटलमध्ये दररोज सरासरी १७० हून अधिक मुले हा आजार घेऊन येत आहेत. त्याची प्रकरणे पटनामधील मुलांमध्येही दिसून येत आहेत.

दुसरीकडे शाळेत प्रवेशाची प्रकिया सुरू आहे. अनेक मुले पहिल्यांदाच शाळेत जातील. मुलासाठी कोणती शाळा चांगली आहे, याचा शोध पालक घेत असतात. अशा परिस्थितीत H3N2 हा कोरोनासारखा धोकादायक आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

Tags:    

Similar News