बाल अधिकार सप्ताहाच्या निमित्ताने १९ नोव्हेंबर ला दुपारी १२:०० वाजता मानखुर्द या ठिकाणी ३० अंगणवाडी सेविकांसोबत युवा सिटी चाईल्ड लाईन या टीम ने (नेहा,काजल,झुबेर) बाल अधिकार आणि चाईल्ड लाईन कशाप्रकारे काम करते यावर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात नेहा यांनी चाईल्ड लाईन ची PPT दाखवून अंगणवाडी सेविका यांना माहिती दिली. यामध्ये चाईल्ड लाईन ची सुरुवात, चाईल्ड लाईन म्हणजेच १०९८ काय आहे?, १०९८ हा लहान मुलांकडून आलेला नंबर, चाईल्ड लाईन सेवा ही संपूर्ण देशात, चाईल्ड लाईन ला कोणकोणत्या प्रकारची मुलं संपर्क करू शकतात, मुंबई मधील चाईल्ड लाईन ची रचना, चाईल्ड लाईन ची कृती, नागरिक चाईल्ड लाईन ला संपर्क का साधणार ? इ. बाबींची माहिती अंगणवाडी सेविकांना देण्यात आली.
याव्यतिरीक्त यामध्ये बाल अधिकारांबद्दलही माहिती देण्यात आली. यात प्रामुख्याने बालक कोणाला म्हणायचे?, बालकांचे अधिकार असतात का...?, अत्यावश्यक गरजा आणि चैनीच्या वस्तू, पाहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध यामधील बालकांची हानी, UNCRC म्हणजे काय...?, बालकांचे अधिकार (जगण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, सहभागीतेचा अधिकार, काळजी आणि संरक्षणाचा अधिकार) या मुख्य मुद्यांवर प्रकाश टाकून अंगणवाडी सेविकांसोबत सखोल चर्चा करण्यात आली. अंगणवाडी सेविका लहान मुलांच्या आयुष्यात त्याच्या अधिकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग असतात. आणि त्या यामध्ये कशाप्रकारे आपली भूमीका पार पाडू शकतात याची त्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
सर्व अंगणवाडी सेविका यांना चाईल्ड लाईन कडून वही, पेन, फोल्डर आणि चाईल्ड लाईन चे पत्रक ही भेट देण्यात आली. कोमल हा लघुचित्रपट दाखवून चांगला आणि वाईट स्पर्श याची जनजागृती आपण लहान मुलांमध्ये कशाप्रकारे करू शकतो याची कल्पना दिली.