छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचा आणि ह्रदयात घेऊन आयुष्य जगाः संयोगिता राजे

Update: 2022-02-19 13:08 GMT

 देशभरात आज शिवजयंती उत्सवात साजरी केली जात आहे. राजधानी दिल्ली येथे आज शिवजयंती निमित्ताने खासदार संभाजी राजे यांच्या पत्नी संयोगिता राजे आणि खासदार संभाजी राजे यांचे चिरंजीव शहाजी राजे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. आजचा तरूण हा छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचतो. मात्र, त्यांचा विचार डोक्यात घेत नाही. असा सवाल त्यांना केला असता, त्या म्हणाल्या "छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचायचा पाहिजे आणि ह्रदयात घेऊन आयुष्य जगायला पाहिजे" असा संदेश यावेळी तरूणांना दिला.

Full View

Tags:    

Similar News