मोदी साहेब बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय; चाकणकरांचा खोचक टोला
सरकारी तेल कंपन्यांकडून सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.;
सरकारी तेल कंपन्यांकडून सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात 25 ते 28 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात 30 ते 33 पैशांची वाढ झाली आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की,दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असते, काही नाही निदान पेट्रोल-डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आज चौथ्यांदा भाव वाढ झाली. त्यामुळे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेल वर का काढताय?,असा खोचक टोलाही चाकणकर यांनी मोदींना लावला.
मुंबईत आज डिझेलचा भाव 88.82 रुपये प्रति लिटर तर पेट्रोल 98.61 रुपये एवढा आहे.तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये पेट्रोल शंभराच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.