प्रायव्हेट भागाच्या ठिकाणी ऊवा होतात का? #Healthtips
ऊवा फक्त डोक्यावरील केसांमध्येच होतात असं आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल मात्र तसं नाहीये. ऊवा या मानवी शरीराच्या प्रायव्हेट भागांवर देखील होऊ शकतात.
तुम्ही आतापर्यंत डोक्यातील उवांबद्दल ऐकले असेल, परंतु तुम्हाला माहित आहे का की प्रायव्हेट पार्टमध्ये (प्यूबिक एरिया) उवा होऊ शकतात. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) या अमेरिकन संस्थेच्या मते, प्यूबिक उवांना क्रॅब (खेकडे) असं म्हंटलं आहे. एखाद्या लहान किड्यासारखे ते असते, सहजासहजी ते माणसांच्या डोक्यात आढळतात पण फक्त डोक्यावरच्या केसांमध्येच ते आढळतात का? तर तस नाहीये ते माणसाच्या प्रायव्हेट पार्टच्या केसांमध्ये सुद्धा आढळतात. शरीराच्या कोणत्याही भागात ऊवा आढळू शकतात त्यामध्ये मग छाती, पाय, दाढी आणि काखेतील केसांमध्येही त्या येऊ शकतात.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उवा ह्या त्वचेतून रक्त शोषून मोठ्या होतात. त्यांना जगण्यासाठी मानवी रक्ताची गरज असते. प्यूबिक भागातील उवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सरकतात.
तुम्हाला जननेंद्रियांवर उवा आहेत हे कसे ओळखावे?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऊवांची लक्षणे काय आहेत ते देखील पाहू
जघन भागात खाज सुटणे
सौम्य ताप
चिडचिड
चाव्याच्या ठिकाणी निळे किंवा लाल रंगाचे डाग उमटणे
शरीरात उर्जेची कमतरता जाणवणे
या उवा कशा पसरतात?
प्रायव्हेट भागातील उवा सामान्यत: घाण, लैंगिक क्रियाकलाप आणि संक्रमित टॉवेल, बेडशीट किंवा कपड्यांद्वारे पसरतात. कंडोम देखील प्यूबिक उवांपासून संरक्षण करू शकत नाही. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, 'टॉयलेट सीटवर बसल्याने उवा सहज पसरतात हा गैरसमज आहे. असे होऊ शकत नाही कारण उवा मानवी शरीरापासून जास्त काळ दूर राहू शकत नाहीत आणि त्यांना टॉयलेट सीटसारख्या गुळगुळीत पृष्ठभागावर चालण्यासाठी पाय नसतात.
प्रायव्हेट ठिकाणी झालेल्या (प्यूबिक) उवांवर उपाय काय?
प्रायव्हेट ठिकाणी झालेल्या उवा टाळण्यासाठी डोक्याच्या केसांमध्ये उवा नसणे आवश्यक आहे.
जघन क्षेत्र तसेच संपूर्ण शरीर स्वच्छ ठेवा. जघन क्षेत्र कोरडे ठेवा. ओलावा नसावा.
ज्या व्यक्तीसोबत तुम्ही शारीरिक संबंध ठेवत आहात त्याला उवा नसाव्यात. कंडोम उवांपासून संरक्षण करू शकत नाही.
जर तुम्हाला माहीत असेल की एखाद्याला उवा आहेत, तर त्यांचे कपडे, टॉवेल, बेडशीट वापरू नका. त्यांच्याशी संबंध ठेवू नका.
जर तुम्हाला जघन भागात सतत खाज येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.