नवऱ्याचे मंदिर बांधून...ती रोज करते नवऱ्याची पूजा
पोकळी भरून काढण्यासाठी या महिलेने बांधले पतीचे मंदिर;
नवऱ्याच्या निधनानंतर बायकोने आपल्या नवऱ्याचे मंदिर बांधले असून नियमित त्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करतात. पती हा परमेश्वर आहे असं म्हंटल जात पण या महिलेने खरोखरच पतीचे मंदिर बांधले आहे. आंध्रप्रदेशच्या पोडीली मंडालमधील निम्मावर गावात अंकी आणि पद्मावती रेड्डी हे दाम्पत्य राहत होते. पण चार वर्षापुर्वी त्यांच्या नवऱ्याचा अपघातात अचानक मृत्यू झाला.
आपला नवरा आपल्या जवळ नसल्याने त्यांच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे नवरा आपल्या कायम जवळ असावा नेहमी त्यांना पाहता यावे, ते कायम आपल्या सोबत असावेत म्हणून त्यांनी नवऱ्याचे मंदिरच बांधून नवऱ्या विषयी असलेले प्रेम आशा प्रकारे व्यक्त केले आहे.