संतापजनक : गावकऱ्यांनी जाळला अन्नाच्या शोधात आलेला हत्ती

Update: 2021-01-23 09:30 GMT

तामिळनाडूमधील मसिनागुडी गावात आलेल्या हत्तीवर गावकऱ्यांनी पेटता टायर फेकल्याने हत्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. तामिळनाडूमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. गावात आलेल्या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी त्याच्या दिशेने टायर पेटवून फेकला गेला.

फेकलेला टायर हत्तीच्या कानात अडकल्यामुळे हत्ती धावपळ करू लागला. मसिनागुडी या गावात ही घटना घडली त्याचा व्हिडीओ ट्विटवर व्हायरल झाला आहे. १९ जानेवारीला या जखमी हत्तीला उपचारासाठी नेलं जात असताना मृत्यू झाला.

याप्रकरणी तिघांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे तर तिसरा आरोपी फरार झाला असल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


Tags:    

Similar News