मोदीजींनी माझे आयुष्य उध्वस्त केले - राखी सावंत

मोदीजींनी माझे आयुष्य उध्वस्त केले आहे. मी मागच्या दोन रात्री झोपलेले देखील नाही. हा बुस्टर डोस घेतल्यापासून माझा चेहरा सुजला आहे मला झोप येत नाही अशी प्रतिक्रिया अभिनेत्री राखी सावंत दिली आहे.;

Update: 2022-07-21 03:45 GMT

अभिनेत्री राखी सावंत यांनी बूस्टर डोस घेतल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला आहे. हे इंजेक्शन घेतल्यापासून माझ्या शरीरात काय होत आहे मला समजतच नाही आहे मोदीजी हे कसले इंजेक्शन आहे. हे शिलाजीत, व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे हे घेतल्यापासून मी फक्त आदिल यांना शोधात आहे. हा बूस्टर डोस घेतल्यापासून मी वेड्यासारखी झाली आहे. असं राखी सावंत म्हणत आहे.

खरतर सरकारकडून कोरोनाच्या लसीकरणासाठी जनजगृती करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. लोकांमधील गैरसमज सुरू करण्यासाठी अनेक वेळा सरकारकडून आवाहन करण्यात आले. मात्र राखी सावंत यांच्या वक्तव्याने लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. राखी सावंत या समाजमाध्यमांवर नेहानीच चर्चेत असतात त्या ज्या याठिकाणी जातील त्या ठिकाणी ठिकाणी नेहमी माध्यमांचा गराडा असतो. काल राखी सावंत या विमानतळावर दिसताच काही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न केले. यावेळी त्यांनी मोदीजींनी माझे आयुष्य उध्वस्त केले आहे. मी मागच्या दोन रात्री झोपलेले देखील नाही. हा बुस्टर डोस घेतल्यापासून माझा चेहरा सुजला आहे मला झोप येत नाही. हा डोस वयोवृद्ध लोकांना दिला पाहिजे. हे शिलाजीत, व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे. हे घेतल्या पासून मी फक्त आदिल शोधत आहे. मला माहित नाही आता आदिल ची काय अवस्था होईल? माझे शरीर वेगवेगळ्या गोष्टी मागत आहे. मी हे इंजेक्शन घेऊन त्रस्त झाले आहे. असं राखी सावंत म्हणत आहेत.

Tags:    

Similar News