कंगना रणौतला मुंबई उच्चन्यायालयाचा दणका
पासपोर्टला मुदतवाढ मिळण्यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या अडचणी वाढल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पासपोर्ट नूतनीकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने तिला फटकारलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जून रोजी होईल.
मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रनौतच्या याचिकेवर सुनावणी घेताना म्हटलंय की, पासपोर्टची मुदत संपायला येत असताना शेवटच्या क्षणी का याचिका दाखल केली? आता कोर्टाने पुन्हा नव्याने याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी 25 जूनला होणार आहे.
कंगना रणौतला तिच्या 'धाकड' या सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी या देशात जायचं आहे. मात्र कंगनाचा पासपोर्ट १५ सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिला पासपोर्टचं तातडीने नूतनीकरण करणं गरजेचं आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मर्यादा येऊ शकतात. यासाठीच कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, कंगनावर वांद्रे पोलिस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.