कंगना मुंबईत पुन्हा घर बांधेलही पण चाहत्यांच्या मनातील घराचे काय?

Update: 2020-11-27 07:36 GMT

अभिनेत्री कंगना राणौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कंगनाच्या ऑफीसच्या अनधिकृत भागाची पालिकेकडून तोडफोड करण्यात आली होती. ही सुडाची कारवाई असल्याचे कंगनाने न्यायालयात म्हटलं होतं. त्यावर न्यायालयाने पालिकेची नोटीस रद्द ठरवली आहे. तर बीएमसीला यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

"महापालिका अधिकाऱ्याकडून नोटीस काढणे, तिच्या बंगल्यावर चिकटवणे, कारवाईचा आदेश, कारवाईसाठी केलेली तयारी, सुनावणी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न ४० टक्केच कारवाई होणं, संजय राऊत यांनी कारवाईनंतर उखाड दिया म्हणणं हे सर्व याचिकाकर्त्यांच्या दाव्याचं समर्थन करणारं आहे," असं उच्च न्यायालयाने निकाल सुनावताना म्हटलं.

या निकाला नंतर कंगनाने "जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी ठाकते आणि जिंकते तेव्हा त्या व्यक्तीचा विजय नसतो तर तो लोकशाहीचा विजय असतो"असं ट्वीट करत न्यायालयाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, कंगना रनौत हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि तिच्यातील वाद शिगेला पोहचला. तिच्या या वक्तव्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने कंगना मुंबईत पुन्हा घर बांधेलही पण चाहत्यांच्या मनातील घराचे काय? असा प्रश्न पडतो.


Tags:    

Similar News