"पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…" कंगनाने पुन्हा शिवसेनेला डिवचलं

रिपब्लीक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने ही प्रतिक्रीया दिली आहे.;

Update: 2020-11-04 05:30 GMT

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थनार्थ भाजप नेत्यांसह अनेकजण उतरले आहेत. तसंच अर्णब यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगना रनौत देखील उतरली आहे. तिने अर्णब यांच्या अटकेनंतर एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात तिने "सोनिया सेनेला एवढा राग का येतो? आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचं कर्ज फेडावं लागेल" असं म्हटलं आहे.

काय म्हणाली कंगना?...

"सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील. पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनियासेना." असं कंगनाने म्हटलं आहे.

दरम्यान, २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या मृत्यूच्या चौकशी संदर्भात अर्णब गोस्वामी यांना महाराष्ट्र सीआयडीने अटक केली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अर्णबला अलिबाग येथे नेण्यात आले आहे.

Tags:    

Similar News