नियमांचे उल्लंघन; अभिनेत्री आलीय भट्टला पडणार महागात, BMC चे गुन्हा नोंदवण्याचे आदेश..

Update: 2021-12-17 06:52 GMT

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टविरुद्ध महामारी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याची तयारी सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) होम क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री आलीय भट्ट विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आलिया भट्टचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, परंतु बीएमसीच्या नियमांनुसार, रुगणांच्या संपर्कात आलेल्या लोकांना 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणे आवश्यक आहे, परंतु ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या पोस्टर लाँचसाठी आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत दिल्लीत ती गेली होती. यावेळी त्या दिल्लीत अनेक लोकांना भेटली असल्याचं देखील म्हंटल जात आहे. अशा परिस्थितीत आलियाने बीएमसीचा नियम मोडला आहे. बीएमसी या प्रकरणाची चौकशी करत होती आणि नियमांचे उल्लंघन झाल्याची पुष्टी केल्यानंतर आता आलीय भट्ट यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.

BMC सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष राजुल पटेल यांनी मी DMC आरोग्य विभागाला आलिया भट्टविरुद्ध होम आयसोलेशन नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले असून त्यांनी जबाबदारीने वागायला हवे होते. नियम सर्वांसाठी समान आल्याच त्यांनी म्हंटल आहे. आलिया भट्ट दिल्लीला जात असल्याची माहिती मिळताच बीएमसीच्या एच-वेस्ट वॉर्डच्या आरोग्य विभागाने बुधवारी तिच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुम्ही दिल्लीत राहा, मुंबईत परत येऊ नका, जेणेकरून आणखीन लोक संपर्कात येऊ नयेत. पण आलियाने न जुमानता रात्री उशिरा मुंबईत परतली आहे. त्यामुळे आता या अभिनेत्रीवर साथीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


तीन दिवसांत सहा सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सेलिब्रिटींमध्ये ज्या प्रकारे कोरोनाचा धोका वाढला आहे, त्यामुळे महापालिकाही चिंतेत आहे. अवघ्या दोन दिवसांत करीना कपूर, अमृता अरोरा, संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि त्यांची मुलगी शनाया कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि त्यांचा धाकटा मुलगा योहान सह 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, करिना कपूरसोबत बीएमसीने महीप कपूरचे घरही सील केले आहे. हे सर्व सेलिब्रिटी गेल्या आठवड्यात करण जोहरच्या घरी पार्टी करण्यासाठी पोहोचले होते. BMC ने पार्टीचे पाहुणे आणि सेलिब्रिटींचे कर्मचारी यांच्यासह ४० लोकांची RT-PCR चाचणी घेतली आहे. करण जोहर आणि मलायका अरोरा यांचा कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. करण जोहरच्या घराचीही स्वच्छता करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News