"बायकोशी संबंध ठेवून माझ्याशी.." भाजप पदाधिकाऱ्याचा कारनामा चव्हाट्यावर
भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा सोबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. एका महिलेने स्वतः व्हिडिओ बनवत श्रीकांत देशमुख यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केली असल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमातून समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. आता हा सर्व प्रकार जनतेसमोर आल्यानंतर मग भाजपने त्यांचा राजीनामा घेतला आहे. या सर्व प्रकारानंतर भाजपच्या नेता चित्रा वाघ यांनी संबंधित तरुणीला तत्काळ पोलिसात तक्रार द्यावी असं आवाहन करत योग्य ती कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे.
भाजपचा पदाधिकारी श्रीकांत देशमुख कोण आहे?
श्रीकांत देशमुख हे पैलवान आहेत. ते नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. यापूर्वी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ते सांगोला मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाच्या तिकिटावर उभे होते. त्यावेळी निवडणूक प्रचारात आपल्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर गोळीबार केल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली होती. सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी या प्रकरणाची तेवढ्याच गांभीर्याने दखल घेऊन चौकशी केली असता देशमुख यांनीच स्वतःविषयी मतदारांमध्ये सहानुभूती मिळविण्यासाठी खोटेपणाने गोळीबाराचा डाव रचल्याचे उजेडात आले होते. त्यामुळे देशमुख यांच्या विरूध्द गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. अलिकडे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून थेट जिल्हाध्यक्षपद मिळविले होते. श्रीकांत देशमुख व महिलेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांचा राजीनामा घेतला आहे.
नक्की काय प्रकार घडला?
एका महिलेने स्वतः हा व्हिडिओ बनवला आहे. ही तरुणी व श्रीकांत देशमुख हे एका रूम मध्ये बसले आहेत. ही महिला रडत रडत सांगत आहे की, हा जो व्यक्ती बसला आहे त्याने मला फसवलं आहे. आणि हा व्यक्ती श्रीकांत देशमुख आहे. या व्यक्तीने माझी फसवणूक केली आहे. हा व्यक्ती बायकोशी संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतो आहे. लग्न करतोय.. यापुढे ती बोलत असताना श्रीकांत देशमुख यांनी त्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतात. हा मोबाईल हिसकावून घेत असताना ती महिला म्हणत आहे की, नाही तू सोड. तू आता बघच. माझ्याशी का खोटं बोललास असा हा संपूर्ण व्हिडिओ आहे.
व्हिडिओ समोर येताच भाजपने केली कारवाई..
हा सर्व प्रकार समाज माध्यमातून समोर आल्यानंतर भाजपने श्रीकांत देशमुख यांच्यावर कारवाई केली आहे. पण हा सर्व प्रकार चार दिवसांपूर्वी घडला आहे. आता हा विडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार जनतेसमोर आला त्यानंतर मग श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यांच्या राजीनाम्याचे पत्र भाजपने प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटला आहे की, भारतीय जनता पार्टी, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारला आहे. मा. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
योग्य ती कारवाई होईल चित्रा वाघ यांचे आश्वासन
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या सर्व प्रकारानंतर संबंधित महिलेला तत्काळ पोलिसात तक्रार द्यावी असं म्हणत योग्य ती कारवाई होईलच असे म्हटले आहे. चित्रा वाघ यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, भाजपा सोलापूर (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या संदर्भातला VDO समोर आलाय यातील जी संबंधीत ताई आहे तिने तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी योग्य कारवाई होईलचं प्रदेशध्यक्ष चांद्रकांदादा पाटील यांनी तात्काळ दखल घेत त्यांना पदावरून मुक्त केलेलं आहे