राज्य सरकारने बलात्काऱ्यांना आश्रय दिला आहे, हे लोकधार्जिणे सरकार नसून कार्यकर्ते पोसणारे सरकार आहे. अशी टीका भाजपा नेते चित्रा वाघ यांनी केली. त्या सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. विद्या चव्हाण यांचे मानसिक संतुलन बघडले असून, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. माझ्यावर आरोप करताना स्वतःची नाही तर, किमान आपल्या डोक्यावर पिकलेल्या केसांची तर लाज ठेवायला पाहिजे होती. माझ्यावर आरोप करण्याची नीच पातळी विद्या चव्हाण यांनी गाठली अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. विद्या चव्हाण यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे त्याच क्षणी मी राजकारण सोडून देईल मात्र, माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना मी सोडणार नाही असा इशारा वाघ यांनी केला.
राज्यात जनमतातील सरकार नसून, जुगाडू सरकार आहे.
नेत्यांची भाषण अशी सुरू आहेत की, जसं एक बाई दुसरा बाईला टोमणे मारते. आताच्या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, सर्वसामान्य महिलांच्या बरोबरच महिला पोलिसांवर अत्याचार आणि बलात्कार झाले आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाते. माझा असा दावा नाही की केवळ याच सरकारच्या काळात अशा घटना घडतात मात्र अशा घटनांवर सरकार काय भूमिका घेते याबाबत माझा आक्षेप आहे, सरकार या घटनांमधील नराधमांना शासन करण्याऐवजी त्यांना आश्रय देते हे दुर्दैवी आहे असं वाघ म्हणाल्या.