भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल."असं सांगीतलं.
त्या म्हणाल्या की, "जनतेने एनडीएला मोठ्या प्रमाणात मतदान करुन जिंकून द्यावं, नितीशकुमार पुढील ५ वर्षे बिहारचे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या राजवटीत बिहार हे भारताचे प्रगतशील आणि विकसित राज्य बनले आहे. मोदी सरकारने घरात मोफत गॅस सिलिंडर वितरित केले. गरीब लोकांसाठी बँकेत खाते उघडले आणि कोरोना कालावधीत प्रत्येक गरीबांना दीड हजारांची आर्थिक मदत दिली.
बिहार हे असं राज्य आहे जेथे सर्व नागरिक राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि सुज्ञ आहेत. पक्षाने दिलेली आश्वासने त्यांना ठाऊक व समजली आहेत. जर कोणी आमच्या जाहीरनाम्यावर प्रश्न विचारत असेल तर आम्ही जे वचन दिले होते ते पूर्ण करतोच, आत्मविश्वासाने त्यांना उत्तर देऊ शकतो. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला करोना विषाणूची लस मोफत टोचली जाईल" असं म्हटंल आहे. दरम्यान, यावेळी "भाजपा है तो भरोसा है' ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प' यासह भाजपाने नवीन नारे दिले आहेत.