इंडियाआघाडीला मोठा धक्का; ममता बॅनर्जी यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांची हो घोषणा इंडिया आघाडीला मोठा धक्का असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात व्यक्त होतीय.देशातील सर्व भाजप विरोधी प्रादेशिक पक्षाची मोट बांधून इंडिया आघाडी बनवण्याची योजना आखली गेली. या आघाडीच्या अनेक बैठका ही झाल्या पण जागा वाटपाचा तिढा काही सुटू शकला नाही. कॉंग्रेस पक्षाने 300 जागा लढवाव्या आणि प्रादेशिक पक्षांना त्यांच्या ताकती नुसार लढू द्यावे ही आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यांनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रे बद्दल काही माहिती नसल्याचही सांगितलं.
ही नक्की घोषणाच की दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न?
गेल्या अनेक दिवसापासून जगावाटपा बद्दल चर्चा होत होत्या पण तोडगा काही निघत नव्हता, नितीश कुमारांचं चालू असलेलं तळ्यात,मळ्यात आणि मायावती यांनी केलेली स्वबळावर निवडणुकीची घोषणा. आणि कॉंग्रेसच्या वेळ काढू धोरणाला अनेक प्रादेशिक पक्ष वैतागले होते. यालाच धक्का म्हणून ममता यांनी ही घोषणा केली नसेल न अशी चर्चा होतीय.