Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली 'भवानी देवी'

Update: 2021-07-26 04:56 GMT

Tokyo Olympics 2020: आज भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics ) शानदार सुरुवात केली आहे. भारताच्या सीए भवानी देवीने (Bhavani Devi ) ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजिजचा पराभव करत तलवारबाजीचा सामना जिंकून इतिहास रचला आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिली महिला खेळाडू (Bhavani Devi became India's first female athlete to win a fencing match at the Olympics) आहे.  भवानी देवीचा एफआयई रँक ४२ असून नादिया ३८४ व्या क्रमांकावर आहे. सुरुवातीपासून भवानीने वर्चस्व ठेवलं होतं. पहिल्या हाफमध्ये भवानी देवीने ८-० ने पहिल्या राउंडमध्ये विजय मिळवला.  पुढे भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ ने पराभव केला.

चेन्नई येथील भवानी देवी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारपटू आहे. आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या भवानी देवीने राष्ट्रकुल चँपियनशिप टीम स्पर्धेत रौप्य व कांस्यपदक सुद्धा जिंकलेले आहे. विशेष म्हणजे याच चँपियनशिमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुद्धा तिला कांस्यपदक मिळाले होते. २०१० च्या आशियाई तलवारबाजी स्पर्धेतही तिने कांस्यपदक जिंकले होते.

ऑलिम्पिक 2020 मधील प्रवास संपला

मात्र महिला सेबर व्यक्तिगत तलवारबाजी स्पर्धेत सीए भवानी देवीचा पराभव झाला असून, टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिचा प्रवास संपला आहे.महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत झाला. या सामन्यात फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटनं भवानी देवीचा 7-15 नं पराभव केला.

Tags:    

Similar News