कौतुकास्पद ; प्रथमच बेस्टच स्टेअरिंग महिलेच्या हाती..

बेस्टच्या पहिल्या महिला चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मी जाधव या 41 वर्ष्याच्या महिला लवकरच बेस्ट बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेणार आहेत.

Update: 2022-05-22 12:05 GMT

तुम्ही मुंबईत आलात की ज्या अनेक गोष्टींचे कुतूहल असते त्यात सर्वांची एक आवडती गोष्ट म्हणजे बेस्ट...मुंबईत फिरायचं म्हंटल की आपल्याला लोकल आणि बेस्ट सारखा दुसरा खिशाला परवडेल असा पर्याय नाही. या बेस्ट ने आतापर्यंत अनेक बदल अनुभवले आहेत. त्यात आता आणखीन एक मोठा बदल घडतो आहे. पण हा बदल आता बेस्ट मध्ये घडणार नाहीये तर ही बेस्ट जे चालक चालवतात त्यामध्ये घडणार आहे. त्यात बदल घडणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे? तर तुम्हाला बेस्टचे सर्व चालक पुरुष दिसत असतील पण आता असं होणार नाहीये.. या पुरुष चलकांसोबत तुम्हाला महिला चालक सुद्धा दिसणार आहेत. आणि याची सुरवात झाली आहे म्हणायला हरकत नाही.

बेस्टच्या पहिल्या महिला चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मी जाधव (४१) या लवकरच बेस्ट बसचे स्टेयरिंग आपल्या हातात पकडणार आहेत.

जेव्हा पासून बेस्टची स्थापना झाली, बेस्ट लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाली अगदी तेव्हापासून म्हणजे सन १९२६ पासून प्रथमच एका महिला चालकाची निवड झाली आहे. महिला सक्ष्मीकरणाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. जाधव यांच्यासह अन्य काही महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू असून त्यात जाधव यांची पहिली निवड झाल्याचे सर्वत्र बोललं जातं आहे.

या महिलांना बेस्टमध्ये कंत्राटदारांकडून चालविण्यात येणाऱ्या बससेवेसाठी त्या रुजू होणार आहेत. येत्या काही दिवसांतच त्या अधिकृतरित्या बस चालवणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जवळपास पूर्ण झाल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे.

Tags:    

Similar News