बीडमध्ये तरुणीला जिवंत जाळले, आरोपीला पोलीस कोठडी

Update: 2020-11-16 11:55 GMT

बीड जिल्ह्यात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एका 22 वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याच आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणीचा प्रियकर अविनाश राजुरे याने ऍसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळले. या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान आऱोपीला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी प्रियकराने अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणीलो एका खदाणीमध्ये टाकून पळ काढला होता. दरम्यान त्या तरुणाने हत्या का केली? या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? त्या आरोपीला एसिड कुठून मिळाले याचा तपास आता चौकशी दरम्यान करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Tags:    

Similar News