संतापजनक! कबरीतून काढून मुलीच्या मृतदेहावर बलात्कार

माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून, सर्वच स्तरावरून याचा निषेध केला जात आहे.;

Update: 2021-08-20 05:35 GMT

दफन केलेल्या महिलेचा मृतदेह बाहेर काढून त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. पाकिस्तान मधील सिंध प्रांतातील 14 वर्षीय मुलगीचाआजारपणात मृत्यू झाला होता. त्यानंतर तिला दफन केले होते. या दफन केलेल्या मृतदेहाला बाहेर काढून अर्धा किलो मीटरवर असलेल्या जंगलात नेऊन बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तो मृतदेह त्याच ठिकाणी सोडून आरोपीने पळून गेला.

अमीन चांडीओ या 14 वर्षाच्या मुलीचा 12 ऑगस्टला आजारपणात मृत्यू झाला होता. तिच्या नातेवाईकांनी रितीरिवाजाप्रमाणे 13 ऑगस्टला तिचे दफन केले होते. त्याच रात्री आरोपी रफिक चांडीओ याने मृतदेह कबरीच्या बाहेर काढला त्यानंतर तो अर्धा किलो मीटरवर असलेल्या जंगलात नेवुन त्यानंतर त्या मृतदेहावर त्याने बलात्कार करून मृतदेह झुडपात फेकून दिला व आरोपी पळून गेला. आरोपी रफिक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे देखील आहेत.

या सर्व प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी नागरिकांना ती कबर खोदली असल्याचे आढळले. त्यामुळे नागरिकांनी तिथे जाऊन पाहिले त्यावेळी कबरीत मृतदेह नव्हता. ही सर्व गोष्ट बाबत मुलींच्या कुटुंबीयांना माहिती दिली गेली. या सर्व घटनेबाबत पोलिसांना देखील कळविण्यात आले. मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर तो मृतदेह जवळच असलेल्या जंगलातील एका झुडपात आढळून आला. मृतदेह विचित्र अवस्थेत होता. मृतदेहाला रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणीनंतर मृतदेहावर बलात्कार केला असल्याचं स्पष्ट झाले आहे.

Tags:    

Similar News