हाती झाडू घेत अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उभारलं कोविड सेंटर
कामगार उपलब्ध नसल्यामुळे अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाची साफसफाई करत उभारलं कोविड सेंटर? कोण आहेत अंकिता पाटील? जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी;
राज्यात करोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावला आहे. लॉकडाऊनमुळे कामगार उपलब्ध नसल्याने इंदापूर येथील बावडा ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता करत 50 बेड असलेलं कोविड केअर सेंटर अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी सुरु केलं आहे. ही माहिती आणि स्वच्छता करतानाचे फोटो पोस्ट करुन खुद्द अंकिता पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
लॉकडाऊनमुळे कामगारांच्या हाती रोजगार नसल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या गावचा रस्ता पकडला आहे. परंतु अशा परिस्थितीत कामगारांची वाट न पाहता अंकिता यांनी इंदापूर पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या समवेत संपूर्ण बावडा ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता केली व अधिक विलंब न करता 50 बेड कोविड केअर सेंटर सुरू केले.
लॉकडाऊनमुळे मदतीसाठी कामगार उपलब्ध नसल्याने इंदापूर पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या समवेत स्वत: संपूर्ण बावडा ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता केली व अधिक विलंब न करता 50 बेड कोविड केअर सेंटर सुरू केले. दरम्यान, भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उभारलेल्या बावडा ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी त्यांनी तब्बल १७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
राज्यातली वाढती करोना रुग्णसंख्या पाहता रुग्णालयात रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, वेंटिलेटर बेड या सगळ्या सुविधांची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत.
कोण आहे अंकिता हर्षवर्धन पाटील?
अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. अंकिता पाटील या एक भारतीय राजकारणी, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या, एस.बी. पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा, ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर उपसमितीच्या सहअध्यक्ष व इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लि.च्या संचालिका आहेत. त्याचबरोबर अंकिता पाटील महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी बावडा लाखेवाडी येथून जिल्हा परिषद निवडणुकीत 17 हजार 274 मतांनी विजयी झाल्या आहेत.