होडीने प्रवास करत बालकांना आहार पोहोचवणाऱ्या रेलुबाई वसावेंचा यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार...

18 किमी. प्रवास करून बालकांना पोषण आहार देणाऱ्या नवहिरकणीचा यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार, कोण आहे रेलुबाई वसावे?;

Update: 2021-08-08 10:09 GMT
होडीने प्रवास करत बालकांना आहार पोहोचवणाऱ्या रेलुबाई वसावेंचा यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार...
  • whatsapp icon

नंदूरबार: नवजात बालकं ते 5 वर्षांखालील बालकांच्या आरोग्यासाठी पोषण आहार पोहोचवण्यासाठी शासन सतत प्रयत्न करत असतं. मात्र, शासनाच्या या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम रेणू वसावे सारख्या अंगणवाडी सेविका करत असतात. नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भागात कोरानाकाळतही होडीमधून प्रवास करत रेणू वसावेयांनी बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचवण्याचं काम केलं.

या अंगणवाडी सेविकेचा सत्कार आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

कोण आहेत रेलुबाई वसावे..

अंगणवाडी सेविका लहान बालकांना पोषण आहार मिळावा म्हणून मोलाची भूमिका निभावतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडीतील बालकांना त्यांचा आहार वेळेवर मिळावा. यासाठी रेणूबाई होडी च्या साहाय्याने दररोज अठरा किलोमीटरचा प्रवास करतात. कोरोना काळातही मागे न हटता बालकांना त्यांचा आहार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या नव्या हिरकणीचा सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे.

रेलुबाई यांच्या या विशेष धाडसाचं आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक आज राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री Adv. यशोमती ठाकूर यांनी केले.

सौंदरी ते चिमखेडी असा जीवघेणा प्रवास तिने स्वतःच्या शिरावर अनेकदा लीलया पार केला आहे. तिच्या या सामान्य कर्तृत्वामुळे तिचा सत्कार करताना केवळ तिलाच नव्हे तर संपूर्ण महिला विभागाला, हजारो अंगणवाडी ताईंना यानिमित्ताने ऊर्जा मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्कारानंतर बोलताना व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News