चंद्रपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक पूर परिस्थितीत ग्रामस्थांची विचारपूस करण्यासाठी पोचलेल्या आमदार सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर भडकले असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे.पळसगाव या गावात मदत नाकारणाऱ्या अधिकाऱ्याची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. सुरक्षित स्थळ म्हणून वेकोलिचा हॉल देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. त्यानंतर मुनगंटीवार यांना हा प्रकार नागरिकांनी सांगितल्या नंतर काही तासात मदत पोचवा अन्यथा हिशोब करतो अशा शब्दात त्यांनी थेट अधिकाऱ्यांना फोन करत झापले आहे.
त्याच सोबत या गावाच्या आसपास अनेक ठिकणी चुकीच्या पद्धतीने कोळसा खाणीतील मातीचे ढिगारे उभे केले आहेत. आणि याच हलगर्जीपणामुळे गावाला पुराचा फटका बसला आल्याचं ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांप्रती दाखविलेला हलगर्जीपणा पाहून संतापलेल्या मुनगंटीवार यांनी अधिकारी वर्गाला चांगलेच फैलावर घेतले आहे.