माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच. प्रत्येक विषयावर त्यांचे असे वेगळे मत असतेच. आताही त्यांनी कोरोना लसीच्या बाबतीत एक ट्वीट केलं आहे. या एका ट्वीटची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांना चक्क आपलं वय जास्त असावं असं वाटतं आहे.
"आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे" असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना लसीकरणाबाबत त्यांनी हे ट्वीट केलं आहे.
दरम्यान, सध्या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. केंद्र सरकारनं देशात 45 वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. अमृता फडणवीस यांना त्यांचं वय कमी असल्यानं लस घेता येत नाही. याची खंत त्यांनी ट्वीटमधून व्यक्त केली आहे.