उंबरठा न ओलांडणारा राजा, अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमांतून पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमांतून पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत ट्वीट केले आहे की… "ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेटत नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही" अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वीही नुकतंच अमृता फडणवीस यांनी लसीकरणाच्या मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.