आमिर खानच्या मुलीने बिकनी घालून केक कापला म्हणून नेटकरी संतापले..
वाढदिवसाचा केक कापताना आमिर खानच्या मुलीने बिकनी घातली म्हणून अनेकांनी तिचे संस्कार काढले तर अनेकांनी अत्यंत खालच्या पातळीच्या कॉमेंट केल्या आहेत. एखाद्याच्या खाजगी आयुष्यात इतकं झोकून बघणं किंवा इतक्या खालच्या भाषेत कॉमेंट करणं कितपत योग्य आहे तुम्हीच ठरवा..;
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानची मुलगी ईरा खान ही तिच्या वाढदिवसाच्या फोटोवरून चांगलीच ट्रोल होतं आहे. इरा खान ही अजूनही चित्रपटांपासून दूरच आहे. मात्र ती नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. इरा खान इतकी बिनधास्त आहे की, ती समाजमाध्यमांवर बिनधास्त व्यक्त होत असते. त्याचसोबत तिच्या दैनंदिन जीवनातील फोटो शेअर करत असते. अनेक वेळा नेटकर्यांनी तिला तिच्या बॉयफ्रेंड सोबतच्या फोटो वरून सुद्धा ट्रोल केलं आहे. पण आता इरा ट्रोल होण्याचं कारण तिचा बॉयफ्रेंड नाही तर तिच्या वाढदिवसाचे फोटो आहे.
इराचा रविवारी वाढदिवस होता. तिने वाढदिवस साजरा करत असलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.आता हे वाढदिवसाचे फोटो समोर येताच इंटरनेटवर ते प्रचंड व्हायरल झाले. कारण या फोटोत ईराची स्टाईल पाहून चाहते थक्क झाले आहेत. अनेक जण कमेंट करून तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तर अनेक जण असे काय फोटो इराने शेअर केले आहेत असं म्हणत आहेत. तिने अस काय फोटो शेअर केले आहेत. तर तिने केक कापून वाढदिवस साजरा करत असलेले हे फोटो आहेत यामध्ये अमीर खान त्याची बायको किरण राव त्याचसोबत तिचा बॉयफ्रेंड व अनेक मित्र तिचा वाढदिवस साजरा करत आहेत.
आता ती वाढदिवस साजरा करतीये हे ट्रोल होण्याचं कारण नाहीये. तर कारण आहे तिने परिधान केलेला ड्रेस. सराने बिकनी घालून केक कट केला आहे. तर अमीर खान हा देखील केक कट करताना शर्टविनाच दिसतो आहे. आता लोकांनी त्यांना यावरून ट्रोल केलं आहे. इराचे बाकीचे फोटो पाहिले तर ते स्विमिंगपूलमध्ये धम्माल करताना दिसत आहेत.
आता या कपड्यावरून नेटकरी अमीर खानच्या कुटुंबावर चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी अमीर खानच्या मुलीचे संस्कार काढले आहेत तर अनेकांनी अत्यंत खालच्या भाषेत तिच्यावर टीका केली आहे. आता कोण काय घालते व कोण काय फोटो शेअर करतं यावरून त्यांना ट्रोल करणं योग्य आहे का? इरा खानच नाही तर अनेकांना अशा प्रकारे कपड्यावरून ट्रोल केलं जातं. मध्यंतरी अभिनेत्री मलायका अरोरा यांना सुद्धा ट्रोल केलं गेलं. त्यांना ट्रोल करण्याचं कारणच फार हास्यास्पद होतं. त्यांनी सकाळी फिरायला जाताना ब्रा घातली नाही म्हणून त्यांच्यावर नेटकरी तुटून पडले. अगदी त्यांचं हे दिसत आहे ते दिसत आहे पर्यंत लोकांनी कॉमेंट केल्या. पण एखाद्याच्या खाजगी आयुष्यात इतकं झोकून बघणं आणि इतक्या खालच्या भाषेत कॉमेंट करणं कितपत योग्य आहे तुम्हीच ठरवा..