US Presidential election : एका मताचं महत्व सांगण्यासाठी अमेरिकन कलाकारांनी उतरवले कपडे
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र या निवडणूकीच्या आधी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काही हॉलिवूड सेलिब्रिटिंनी नेकेड व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले आहे.
सर्व सेलिब्रिटींनी 2020 च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करण्यास प्रोत्साहित करीत आहेत. अमेरिकन नागरिकांना नियमांनुसार मतदान करण्यास सांगत आहेत. व्हिडिओची सुरुवात क्रिस रॉकपासून होते. तो लोकांचे लक्ष वेधण्यासाठी म्हणतो – मी नग्न आहे. यानंतर, अभिनेत्री टिफनी हॅडिश बोलताना दिसते. काही क्षणानंतर, अॅव्हेंजर्स अभिनेता मार्क रुफॅलो येतो आणि म्हणतो, 'तुम्ही काय विचार करता हे मला माहित आहे. आपण विचार करीत आहात की रफॅलो आपले कपडे घाल.
यानंतर चेल्सी हँडलर येते आणि म्हणते, 'मला मतदानाबद्दल बोलावे लागेल'. मग अभिनेत्री रायन बाथे येऊन म्हणाते, 'तुम्हाला माहित आहे की तुमचे बॅलेट नेकेड आहे? जेव्हा तुम्हाला बॅलेट मिळते तेव्हा त्यावर लिहिलेले नियम काळजीपूर्वक वाचा. यानंतर, इतर कलाकार देखील तीच माहिती देतात. या अनोख्या पद्धतीने मतदानाबद्दल बोलताना सारा सिल्व्हरमन म्हणाली, "तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे केले नाही तर तुमचे बॅलेट व्यर्थ ठरवले जाऊ शकते."
नेकेड मत म्हणजे काय?
अमेरिकेतील पेनेस्लेवानिया राज्यात यंदा पोस्टाने मतदान करण्याची परवानगी दिली आहे. मात्र मतदानाचे बेलोट पेपर एनव्होलोपमध्ये व्यवस्थित पॅक करून पोस्ट करायचे आहे. ज्यांच्ये एनव्होलप व्यवस्थित पॅक केलेले नसेल त्यांचे मत रद्द करण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. अशा मताला नेकेड मत म्हणतात. असे मत वाया जाऊ नये म्हणून सेलिब्रिटींनी नेकेड होत या मताचे महत्त्व पटवून दिले आहे.