"सर्व कलाकार तुझ्याबरोबर", गौतमी पाटीलचे प्राजक्ता माळीला समर्थन

Update: 2024-12-29 04:46 GMT

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने शनिवारी बीड येथील संतोष देशमुख हत्याकांडात आपले नाव ओढल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला आणि तिच्याविरोधात वक्तव्य करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

बीडमध्ये खंडणीच्या रॅकेटविरोधात आवाज उठवल्याबद्दल गावातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, ज्यांच्यावर या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे, त्यांच्याबद्दल बोलताना धस म्हणाले की, या दोघांमध्येही महिला कलाकारांना कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्याचा “परळी पॅटर्न” होता. प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख करताना धस माळी यांना परळी परिचित असल्याची टिप्पणी केली होती. त्यांचे हे वक्तव्य शुक्रवारी व्हायरल झाले.

प्राजक्ता माळी ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. ती एका खाजगी टेलिव्हिजन वाहिनीवर 'महाराष्ट्राची हस्या जत्रा' या लोकप्रिय मराठी कॉमेडी शोचे अँकरिंग करते आणि राज्यात तिचे लक्षणीय चाहते आहेत. सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणात प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला. या सगळ्या प्रकरणानंतर शनिवारी मुंबईत प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली. त्यात ती म्हणाली की, धस यांनी धस यांनी माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले होते आणि त्याचा अर्थ काय आहे? हे त्यांना चांगलाच ठाऊक आहे. प्राजक्ता माळीने या सर्व प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली असून धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाई करण्याची विनंती प्राजक्ता माळीने केली आहे. पुढे पत्रकार परिषदेत प्राजक्ता म्हणाली की, “आम्ही कलाकार आहोत आणि आम्ही सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना आमंत्रित असतो. “कलाकारांना, विशेषत: माझ्यासारख्या महिला कलाकारांना अशा प्रकारे लक्ष्य केले गेले, तर ते एक वाईट उदाहरण असेल. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून कठोर कारवाई करवी”. या सर्व प्रकरणात मराठी कलाकार आणि काही राजकीय नेत्यांनी भाष्य केले असून, काहींनी प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे.

काय म्हणाले खासदार अमोल कोल्हे?

“आमदार सुरेश धस यांचे विधान मी ऐकले. त्यामुळे त्या विधानाला आणखी वेगळे काही वळण देण्याची गरज नाही, असे मला वाटते. कोणत्याही पुराव्याशिवाय कुणावरही शिंतोडे उडवता कामा नये. सुरेश धसांच्या विधानातून मला जेवढे समजले त्यानुसार त्यांनी फक्त इव्हेंटबाबत वक्तव्य केले होते. या पलीकडे जर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो अभिनेत्रीच काय तर कुणाच्या बाबतीतही होता कामा नये”, अशी प्रतिक्रिया डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

सचिन गोस्वामी यांनी काय म्हटलं?

सचिन गोस्वामी यांनी म्हटलं आहे की, ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे, क्लेषदायक आहे... आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.

काय म्हणाली गौतमी पाटील?

“प्राजक्ता ताई, आम्ही सर्व कलाकार तुझ्याबरोबर आहोत. या गोष्टीवरून ट्रोल जरी केलं तरी लक्ष देऊ नकोस. तू पत्रकार परिषदेत जे काही बोलली ते मी मगाशी ऐकलं. तू जे काही बोलली ते सगळं बरोबर होतं. मी एक कलाकार आहे, तर माझी एक विनंती आहे, कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्याबरोबरच नाही, तर कोणाहीबरोबर त्या कलाकाराचं नाव जोडू नका. कलाकाराचं दुःख हे कलाकाराचं माहीत असतं.” 

Tags:    

Similar News