''दारू औषधासारखी काम करते'' साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना नवा साक्षात्कार

Update: 2022-01-23 06:04 GMT

आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत असलेल्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग दारूवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत आल्या आहेत.

भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत असतात. त्यातच त्यांनी थेट दारूवर वक्तव्य करत थोडी थोडी पिया करो, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांनी म्हटले आहे की, दारू स्वस्त असो वा महाग, दारू ही औषधासारखी काम करते. त्यामध्ये असलेले अल्कोहोल हे औषधासारखे काम करते. मात्र ते प्रमाणात घेतले पाहिजे अन्यथा औषधासारखे काम करणारे अल्कोहोल विष बनते, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंग यांनी केले आहे.

दारूमुळे घरात वाद होतात, गुन्हेगारी वाढते, असे सांगत त्यांनी मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या दारू बंदी मोहिमेचे समर्थन केले. तर दारू अधिक प्रमाणात प्यायल्याने होणारे नुकसान सांगत ती थोडी थोडी पिण्याचा सल्लाच उमा भारती यांनी जनतेला दिला आहे.

दारू आरोग्यास घातक आहे असे सांगतानाच दारू औषधासारखी काम करते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात दारूचे सेवन करण्याचा सल्ला नेमका काय सांगतो? यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तर साध्वी प्रज्ञासिंग या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यापुर्वी गोमुत्र प्यायल्याने कोरोना होत नाही, अशा आशयाचे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंग यांनी केले होते. त्यापाठोपाठ आता दारू ही औषधासारखी काम करते, असे वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञासिंग वादात सापडल्या आहेत.

Tags:    

Similar News