क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी - अजित पवार

सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटल आहे. त्यांनी काल सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त त्यांच्या जन्मगावी जाऊन स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.;

Update: 2022-01-04 04:26 GMT
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी - अजित पवार
  • whatsapp icon

काल सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थान असलेल्या सातारा जिल्यातील नायगाव या ठिकाणी देखील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्या घरात सावीतरबाईंचे बालपण गेले त्या घराची देखील आकर्षक सजावट करण्यात आली होती. काल अनेक मान्यवरांनी त्यांच्या गावी भेट देत त्यांना अभिवादन केले.




राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखीलत्यांच्या जन्मगावी जाऊन स्मारकास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यावेळी त्यांनी साजरा होणाऱ्या 'महिला शिक्षण दिना'च्या राज्यातील जनतेला शुभेच्छा देखील दिल्या.




 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. त्यांनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ साथ लाभली. देशात स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली व त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली. नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.




 देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचं श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे. त्यांचं कार्य सदैव स्मरणात राहील. अस अजित पवार यांनी म्हंटल आहे.




 


Tags:    

Similar News