मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबईतील विक्रोळी (Vikhroli) भागात दरड कोसळल्याची दुर्घटना समोर आली होती, ज्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घटनेची पाहणी करण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) सुद्धा घटनास्थळी आले होते. त्यांच्या याच पाहणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते एका महिला पत्रकाराच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे (aditya thackeray) पाहणी करत असताना सोबत काही माध्यम प्रतिनिधी सुद्धा तिथे उपस्थितीत होते. जाण्यासाठी जागा छोटी होती आणि त्यात पायऱ्यांवर पावसाचे पाणी सुद्धा होते.
आदित्य जात असताना त्यांच्या आजूबाजूला अधिकारी आणि पोलीसांची गर्दी असल्याने एक महिला पत्रकाराला (Women journalists) पुढे जाण्यासाठी अडचण होत असल्याचे आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी जागेवर थांबत महिला पत्रकाराला (Women journalists) जाण्यासाठी जागा करून दिली, आणि त्यांनतर स्वत: पुढे गेले. ठाकरेंचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, त्याचं कौतुक होत आहे.