Full Viewशरद पवारांचा समर्थ रामदास स्वामींना असलेला विरोध जगजाहीर आहे त्यावरून बोलत समर्थ रासदास स्वामी हे शरद पवारांच्या बापाचेही बाप आहेत असं म्हटलं आहे. शरद पवार हे ब्राम्हणांचा मत्सर करतात म्हणुन त्यांची तुलना डासाशी केली गेली आहे. शरद पवार आपल्या पापांचा घडा भरला आहे गप्प बसा नाही तर राडा होईल असा धमकीवजा इशाराच देण्यात आला आहे. फुकटचा पैसा खाऊन पवारांचं तोंड हे वाकडं झालं असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार हे लबाडांचे लबाड असल्याचं या अभंग रचनेत म्हटलं आहे.
हा वादग्रस्त अभंग पोस्ट करून अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेच पण तिच्यावर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चौफेर टीका करत आहेत. या सगळ्या टीका टिप्पणीला केतकी कशी सामोरी जाते आणि शरद पवार यावर काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.