सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबईतील साकीनाका इथे घडलेल्या बलात्कार प्रकरणात सोमवारी आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार आणि नंतर तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी मोहन चौहानला दिंडोशी (45) सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
गेल्या वर्षी सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू असताना अचाननक १० सप्टेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेने मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद पूर्ण झाला होता पण न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. सी शेंडे यांनी सोमवारी मोहन चौहान याच्यावरील सगळ्या आरोपांमध्ये त्याला दोषी ठरवले. व त्याला काल गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे अशा प्रकरणांमध्ये आरोपीला द्या दाखवणे हा न्याय नाही. असेही न्यायालयाने चव्हाण या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावताना नमूद केला आहे.
बलात्कार आणि खुनाच्या आरोपासह चौहानवर महाराष्ट्र पोलीस कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी) आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १८ दिवसांत चौहानवर मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम, पोलीस निरीक्षक दत्तात्रय चुमे, सहायक पोलीस निरीक्षक महेश सांगळे यांनी केला होता. या प्रकरणी ३७ साक्षीदार तपासण्यात आहे. घटनास्थळाजवळील पुठ्ठ्यांच्या कंपनीतील सुरक्षा रक्षक हा या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. शिवाय घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले चित्रीकरणही या प्रकरणातील मुख्य पुरावा होता.
नेमकं प्रकरण काय?
साकीनाका परिसरात खैरानी मार्गावर आरोपी आणि महिला यांच्यात १० सप्टेंबरच्या रात्री वाद झाले. या वादांमध्ये आरोपीने पिडीत महिलेला मरहाण केली. या मारहाणीत महिला बेशुध्द झाली. तिला त्याच अवस्थेत आरोपीने खेचत नजीकच उभ्या असलेल्या टेम्पो मध्ये नेले. तिच्यावर बलात्कार केला शिवाय लैंगिक अत्याचारही केले. शेजारी असलेल्या पुठ्ठयांच्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन पिडीतेला राजावाडी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. परंतू दुसऱ्याच दिवशी उपचारांदरम्यान पिडीतेचं निधन झालं.