एबी डिव्हिलियर्सने अनुष्का शर्मा आणि विराट कोहली बद्दल केला मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट टीमचा INDIAN CRICKET TEAM स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच दुसऱ्यांदा आईवडील बनणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने या बातमीचा खुलासा केला आहे.;
भारतीय क्रिकेट टीमचा INDIAN CRICKET TEAM स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच दुसऱ्यांदा आईवडील बनणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने या बातमीचा खुलासा केला आहे.
डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली. त्याने म्हटले, "ही विराट कोहलीसाठी VIRAT KOHALI कौटुंबिक वेळ आहे तो सद्य त्याच्या फॅमिलीला वेळ देत असून, त्यांच्या घरी दुसरे बाळ येणार आहे." असं डिव्हिलियर्स म्हणाला आहे.
विराटने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने सांगितले होते की त्याने कौटुंबिक कारणांमुळे रजा घेतली आहे.
डिव्हिलियर्सने विराटसोबत झालेल्या मेसेज चॅटचाही उल्लेख केला. त्याने म्हटले, "मला फक्त हे पाहायचे होते की त्याने काय म्हटले. मी फक्त तुम्हाला (FANS) थोडं प्रेम देऊ इच्छितो. तर मी त्याला लिहिले 'काही काळापासून तुला भेटायची इच्छा होती. तू कसा आहेस?' याला उत्तर देताना विराट म्हणाला, "मला आता माझ्या कुटुंबासोबत राहण्याची गरज आहे. मी चांगला आहे."
विराट आणि अनुष्का ANUSHKA SHARMA यांनी २०१७ मध्ये लग्न केले आणि त्यांना वामिका नावाची एक मुलगी आहे. आता पुन्हा एकदा या स्टार जोडप्याच्या घरी आनंदाची चाहूल लागणार आहे.
या विषयावर बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला, "होय, त्यांचे दुसरे बाळ येणार आहे. होय, हा कौटुंबिक वेळ आहे आणि गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही स्वतःच्या बाबतीत प्रामाणिक आणि खरे नसाल, तर तुम्ही इथे का आहात याची तुम्हाला पर्वा नसते. मला वाटते की बहुतेक लोकांना कुटुंब प्राधान्य आहे. तुम्ही यासाठी विराटला न्याय देऊ शकत नाही."
ही बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहते या स्टार जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.