आई आणि मुलगी एकाच व्यक्तीवर करायच्या प्रेम, हेरगिरी करणाऱ्या तरुणाचा केला गेम
हेरगिरीबाबत संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे, परंतु कानपूरमधील एका तरुणाला हेरगिरी करताना आपला जीव गमवावा लागला आहे.;
हेरगिरीबाबत संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे, परंतु कानपूरमधील एका तरुणाला हेरगिरी करताना आपला जीव गमवावा लागला आहे. हा तरुण आपल्या ओळखीच्या एका मित्राच्या सांगण्यावरून त्याच्या आई-मुलीच्या प्रेमसंबंधांची हेरगिरी करीत असे. तो या दोघींद्दल आणि त्यांच्या प्रियकर बाबतची माहिती आपल्या मित्राला देत होता. त्यामुळे प्रियकराच्या मदतीने प्रीयेसी आई-मुलीने युवकाची हत्या केली. प्रियकर आणि आई-मुली दोघांनाही पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.
कानपूरच्या कोहना पोलिस स्टेशन भागात राहणाऱ्या नवीनचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी चोवीस तासांत हत्येचा खुलासा केला आहे. अवैध संबंधाची हेरगिरी करत असल्याने नवीनची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रणजित पाले आणि त्याची गर्लफ्रेंड आई आणि मुलीला अटक केली आहे.
या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी संजीव त्यागी म्हणाले की, रणजित पाले याचे त्याच भागात राहणार्या भरत नावाच्या तरुणाच्या आई आणि बहिणीशी अवैध संबंध होते. याचा भरतला संशय आल्याने त्याने आपल्या ओळखीचा मित्र असलेल्या नवीनला यासंदर्भात हेरगिरी करण्यास सांगितले. त्यामुळे नवीन त्या तिघांची हेरगिरी करीत असे आणि भरतला संपूर्ण माहिती देत असे.
नवीनने दिलेल्या माहितीनंतर भरत आई आणि बहिण दोघांना मारहाण करायचा, त्यामुळे आई-मुलीने आपल्या प्रियकर रणजितला नवीनचा विषय संपवून टाकण्याच सांगितले आणि तिघांनी मिळून नवीनला ठार मारण्याची संपूर्ण योजना आखली. यासाठी रणजितने प्रथम नवीनशी मैत्री केली, त्यानंतर रणजितने नवीनला आपल्याबरोबर टेस्कोच्या निर्जन कॉलनीत नेले, तेथेच त्याने विजेच्या वायरने गळा आवळून खून केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि तपासादरम्यान रणजितला अटक करण्यात आली आणि काटेकोरपणे चौकशी केली असता संपूर्ण घटना उघडकीस आली आणि नवीनला हेरगिरी करताना आपला जीव गमवावा लागला हे उघड झालं.