मुंबईत बलात्कारानंतर तरुणीला ट्रॅकवर फेकलं, नराधमांना सरकार 'शक्ती' दाखवणार?

Update: 2020-12-25 14:00 GMT

मुंबईत एका तरुणीला बलत्कार करुन ट्रॅकवर पेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणीची प्रकृतीची स्थिर असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात व्यक्तीने या 25 वर्षीय तरुणीला धावत्या लोकल मधून वाशी खाडी पुलावर ढकलून दिल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी मंगळवारी सकाळी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळालगत जखमी अवस्थेत सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात सदर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळुन आले आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

पीडित तरुणीही टिटवाळा येथे राहते. ती पवई येथे घरकाम करते. तसेच ती आठवडयातून एकदा आपल्या घरी जात असते. त्यानुसार ती शनिवारी सायंकाळी आपल्या घरी टिटवाळा येथे गेली होती. त्यानंतर रविवारी सायंकाळी ती पवई येथे आपल्या कामाला निघून गेली होती. त्यानंतर तिचा कुटुंबियांशी तिचा संपर्क झाला नव्हता. मात्र मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास सदर तरुणी वाशी खाडी पुलावर रेल्वे मार्गाच्या रुळालगत जखमी अवस्थेत असल्याचे मोटारमनच्या निदर्शनास आले. मोटरमनने याबाबतची माहिती स्टेशनमास्तरला दिल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या जवानांन या जखमी तरुणीला तत्काळ वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.

सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर असुन ती अद्याप बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे वाशी रेल्वे पोलिसांनी सांगितले. ही तरुणी बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर नक्की घटना काय घडली, हे स्पष्ट होईल . प्राथमिक तपासात सदर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळुन आले आहे. मात्र फॉरेन्सिक अहवालाची वाट पोलीस पाहत आहेत.

मनोधौर्य योजनेतून मदत करा- नीलम गोऱ्हे

दरम्यान पीडितेला मदत मिळण्याबाबत मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव पोलिसांनी तात्काळ विधी व न्याय प्राधिकरण यांच्याकडे पाठविण्यात यावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. तसंच आरोपींला शोधण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी यंत्रणेला आदेश देण्यात यावेत आणि पिडीत तरुणीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन करावे अशा सूचनाही दिल्या आहेत.

Tags:    

Similar News