मुलाला तुमचं नाव द्या सांगितलं तर गणेश नाईकांनी पिस्तुल बाहेर काढलं, पीडितेचे गंभीर आरोप
गणेश नाईकांनी मला आणि मुलाला वाऱ्यावर सोडले, पिडीतेचे गंभीर आरोप;
आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसून आले आहे. मागील दोन दिवसापूर्वी सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध एका महिलेच्या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.आज परत एकदा नेरूळ पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध लैंगिक शोषण चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणीत दिवसापूर्वी एका महिलेने गंभीर आरोप केलेत.
मागील सत्तावीस वर्षापासून आपण गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असून आपल्याला गणेश नाईक यांच्यापासून एक पंधरा वर्षाचा मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले होते.मात्र मागील तीन वर्षापासून आपल्याकडे गणेश नाईक हे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून आपल्या मुलाला गणेश नाईक यांचे नाव मिळावे, म्हणून आपल्या गणेश नाईक यांना विचारणा केली असता त्यांनी स्वतः जवळ असलेले पिस्तूल दाखवून मला जीवे मारण्याची धमकी दिली.अशा प्रकारची तक्रार त्यांनी नेरूळ पोलीस स्टेशनला दिली होती.
तसेच गणेश नाईक १९९३ पासून माझ्या घरी रात्री अपरात्री येऊन माझ्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण करत असल्याचे गंभीर आरोप या महिलेने केले होते.या दोन्ही प्रकरणाची नवी मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत मागील दोन दिवसांपूर्वी गणेश नाईक यांच्या फसवणुकीचा गुन्हा सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आज त्यांच्या विरोधामध्ये नेरूळ पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण अर्थात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.