वंदे भारत एक्सप्रेसची किती चर्चा आहे हे आम्ही सांगायला नको. अगदी विमानात जशा सोई सुविधा असतात ताशा सगळ्या सोई या ट्रेनमध्ये आहेत कि काय अशा चर्चा ती ट्रेन सुरु झाल्यापासून आहेत.. या सगळ्या चर्चेनंतर जे व्हायचं तेच झालं.. हीच वंदे भारत एक्सप्रेस गाळायला लागली इतकंच नाही तर या ठिकाणी मिळणाऱ्या जेवणात काय सापडलं हे ऐकून तुम्हाला फार भयंकर असा धक्का बसणार आहे. बाकी काहीही म्हणाला तर वेग सोडला तर बाकी सगळ्याच बाबतीत ही एक्स्प्रेस ट्रेन इतर ट्रेन्ससारखीच निघाली आहे.
वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात चक्क झुरळ सापडला.. बसला ना धक्का... खाद्यपदार्थात झुरळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ट्रेनमधील जेवण आयआरसीटीसीच्या केटरिंगने पुरवले होते. प्रवाशाने ट्विटरवर रेल्वे विभागाला टॅग करून याबाबत माहिती दिली. प्रवाशाने ट्विटमध्ये पराठ्याचे फोटोही शेअर केले होते. या घटनेनंतर इतर अनेक प्रवाशांनीही व्हिडीओ शेअर करत अन्न खाल्ल्यानंतर घशात समस्या जाणवल्याच्या तक्रारी केल्याचे समोर आले आहे. यावर आयआरसीटीसीने ट्विटवर उत्तर देत जेवण पुरवणाऱ्याला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी ग्वाही सुद्धा दिली आहे...
@IRCTCofficial found a cockroach in my food, in the vande bharat train. #Vandebharatexpress#VandeBharat #rkmp #Delhi @drmbct pic.twitter.com/Re9BkREHTl
— pundook🔫🔫 (@subodhpahalajan) July 24, 2023